Esahity pratishtan, ई साहित्य प्रतिष्ठान

  ई साहित्य प्रतिष्ठान
 मनुष्य जन्म, आई-वडील, प्राणवायू आणि ईसाहित्य प्रतिष्ठानची ईपुस्तके फुकट मिळतात.
पण म्हणून त्यांना
 कमी लेखाल तर ती मोठी चूक ठरेल.


या वेबसाईटवर कुठेही बिनधास्त क्लिका. मोकळ्या मनाने फ़ेरफ़टका मारा. अगदी एखाद्या मंदिरात फ़िरता तसे. किंवा बागेत. सगळं फ़्री आणि ईझी. 
मराठी पुस्तकं वाचा. All Free Marathi books  कुठेही पैशाची मागणी नाही. जाहिराती नाहीत. भलत्यासलत्या हायटेक लिंक्स नाहीत, व्हायरस नाही.   
इथे फ़िरा. बघा. बागडा. क्लिका. वाचा. डाऊनलोड करा. फ़्री मनाने, मनसोक्त. आत्मविश्वासाने. मराठी पुस्तक प्रेमिकांसाठी आहे हे.

नियमित मराठी ई पुस्तके मिळवण्यासाठी ... आपला ई मेल पत्ता कळवा... esahity@gmail.com 

आनंद. फ़क्त घेऊ नका. द्या ! आपण डाऊनलोड केलेली मराठी ई पुस्तके वाटा. फ़्री. मेल, ब्ल्युटुथ, पेनड्राईव्ह. सीडी, कोणत्याही स्वरूपात भेट द्या. मस्त गिफ़्ट. मित्रमैत्रिणी, आई बाबा, मुलांना खुश करा. ई पुस्तके म्हणजे केसांत माळलेली फ़ुले. किंवा कानातला अत्तराचा फ़ाया. वजन तर काहीच नाही. आणि आपल्यासोबत इतरांनाही सुखाची पखरण करत जातात. 

ई पुस्तकांशी मैत्री करा आणि मित्रांशी ई-पुस्तकांची ओळख करून द्या. वाचलेल्या पुस्तकांच्या लेखकांना अभिप्राय कळवा. आनंद. फ़क्त घेऊ नका. द्या.

या मराठी पुस्तकांचे कायदेशीर अधिकार ई साहित्य प्रतिष्ठानकडे आहेत.  आम्ही ती पुस्तके फ़्री वाटण्याचे कायदेशीर अधिकार तुम्हाला देत आहोत. 
जगभरच्या मराठी वाचकांना उत्तम मराठी साहित्य सहज आणि विनामूल्य मिळावे म्हणूनच ही सारी खटपट. या अभियानात तुम्हीही सिंहाचा वाटा उचला.  
यात सामिल व्हा. अधिक माहितीसाठी इतर पेजेसना भेट द्या. 


              
केवळ मराठी पुस्तक नाही, केवळ मराठी भाषा नाही.
                   इथे मराठी संस्कृतीचा उत्सव असतो. रोज. क्षणोक्षणी. 



पुस्तके वाचत असताना : संगीताचा आस्वादही घेऊ शकता : एकदा संगीत सेक्शनला भेट द्या : मराठी गाणी  ऐका.
मूळ प्राकृत ज्ञानेश्वरी आणि नेहमीच्या वापरातल्या मराठीतली भावार्थ ज्ञानेश्वरी, दोन्हींचे खुप सुंदर ऑडिओ आहेत. एकदा ऐका. कान तृप्त तृप्त होतील.

              ई साहित्य प्रतिष्ठान :
 एक प्रसन्न अनुभव

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भटक्यांची ब्लॉगर यादी

Goa