नेत्रदान प्रचार-प्रसार

श्रीपाद आगाशे यांची मुलाखत


श्रीपाद  आगाशे - अल्प परिचय 

भाभा अणु संशोधन केंद्रातून निवृत्त . ३६ वेळा रक्तदान केले असून १९८१ पासून वैयक्तिक पातळीवर विविध प्रकारे  नेत्रदान प्रचार-प्रसाराचे  कार्य करीत आहेत . 

विविध प्रकारे माहिती देणे,  सार्वजनिक समारंभ - सोसायट्या- शाळा महाविद्यालये - गणेशोत्सव  वगैरे ठिकाणी मराठी - इंग्रजी - हिंदीमधून पाऊण तासांची व्याख्याने देणे , पोस्टर प्रदर्शने भरवणे , ग्राहक पेठा - सार्वजनिक समारंभ - सोसायट्या - रेल्वे स्थानके वगैरे ठिकाणी  स्टॉल टाकणे , प्रचार साहित्याची निर्मिती करणे वगैरे उपक्रम पार  पाडतात. 
विविध ठिकाणी सुमारे २० ० व्याख्याने दिली असून  सुमारे १०० ठिकाणी स्टॉल टाकले आहेत.
४ भाषांत माहितीपत्रके तयार केली असून सुमारे  सव्वा  लाख माहितीपत्रके प्रसृत केली आहेत.
' डोळस दान ' ( एकांकिका ) आणि ' प्रकाशाची  पहाट ' हा  नेत्रदानावरील कवितांचा संग्रह प्रकाशित. मराठीतील ही  एकमेवाद्वितीय अशी पुस्तके आहेत . 
www.netradaan.blogspot.com हा ब्लॉग चालवतात. फेसबुकवरही माहिती देण्याचा प्रयत्न करतात तसेच  email ने माहितीपत्रके पाठवतात.
Eye Bank Association of India चे आजीव सभासद असून विविध नेत्रपेढ्यांचे सुमारे ८ ००० फॉर्म भरून घेतले आहेत.
मृताच्या  वारसाना भेटून नेत्रदानासाठी  तसेच  त्वचादानासाठीही  
प्रवृत्त करण्याचे प्रयत्न करतात.आतापर्यंत प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष सुमारे १०० नेत्रदाने  आणि ५ त्वचादाने  झाली आहेत.
दूरदर्शन, इतर वाहिन्या तसेच आकाशवाणीवर  मुलाखती  झाल्या आहेत.
ठाणे महानगरपालिका तसेच  विविध  संस्थांचे पुरस्कार मिळाले आहेत.
गेली ४ वर्षे नेत्रदानावर प्राथमिक माहिती देणाऱ्या  र्दिनदर्शिका काढल्या असून ११ ००० प्रती मोफत वाटल्या आहेतआपण आपल्या येथे एखादे व्याख्यान जरुर आयोजित करावे / तसे विविध संस्था - संघटनांना  वगैरे जरुर सुचवावे  तसेच वेगळी  मेल  केलेली नेत्रदानावरीलमाहितीपत्रके  अनेक व्यक्तिंना पाठवावी , फॉरवर्ड करावी ही कळकळीची विनंती.
आपल्या अशा सहकार्यातून पुढेमागे अनेक दृष्टिहीन देशबांधवांना अमूल्य दृष्टी  मिळू शकेल असा सार्थ विश्वास वाटतो .
मुंबई सकाळ , दि.१०-६-२०१४ , पान ६ वरील  ' त्यांनाही जग बघु द्या ' या शीर्षकाखालील श्रीपाद आगाशे यांची मुलाखत वाचण्यासाठी खालील लिंक वापरा.

- SV Agashe 
C 54 , Rashmi Complex , Mental Hospital Road, THANE ( West ) 400604
Tel. 022-25805800 , 9969166607
facebook : Shreepad Agashe

सप्रेम नमस्कार,

मी १९८१ पासून वैयक्तिक  पातळीवर नेत्रदान प्रचार-प्रसाराचे थोडेफार कार्य करतो.

विविध प्रकारे माहिती देणे,  विविध सार्वजनिक समारंभ - सोसायट्या- शाळा,महाविद्यालये - गणेशोत्सव ज्येष्ठ नागरिक संघ- महिला मंडळे - कौटुंबिक समारंभ - विविध व्याख्यानमाला  वगैरे ठिकाणी मराठी - इंग्रजी - हिंदी मधून पाऊण तासांची व्याख्याने देणे ( आतापर्यंत सुमारे २० ० व्याख्याने दिली आहेत ) , पोस्टर प्रदर्शने भरवणे , ग्राहक पेठा - सार्वजनिक समारंभ - सोसायट्या - रेल्वे स्थानके वगैरे ठिकाणी स्टॉल टाकणे , प्रचार साहित्याची निर्मिती करणे वगैरे उपक्रम पार पडतो.
' डोळस दान ' ( एकांकिका ) आणि ' प्रकाशाची  पहाट ' हा माझ्या नेत्रदानावरील कवितांचा संग्रह प्रकाशित. 
www.netradaan.blogspot.com हा ब्लॉग चालवतो. email ने माहितीपत्रके पाठवतो.
नेत्रदानावर  ( मराठी , हिंदी आणि इंग्लिश )माहितीपत्रके सोबत पाठवीत असून ती  वाचून नेत्रदानाचा गांभीर्याने विचार करावा ही कळकळीची विनंती.

नेत्रदानासाठी आपण श्री लंकेसारख्या छोट्या देशावर अवलंबून राहणे अत्यंत लाजीरवाणेच नव्हे काय? या साध्या क्षेत्रात देशाला स्वावलंबी करण्यासाठी आपणही मोठा हातभार लावालच. 

माहितीपत्रके कृपया आपले मित्र-मैत्रिणी,नातलग,परिचित वगैरेंना आवर्जून पुढे पाठवावी, forward करावी. कायमच पाठवीत राहावे ही कळकळीची विनंती.
आपण ही माहितीपत्रके download करून त्यावरून प्रिंट किंवा  photocopies (xerox) काढून वाटता येतील तेवढ्यांना वाटाव्यात.

व्याख्यान आयोजित करण्याचा किंवा आसपास सुचवण्याचा जरूर प्रयत्न करावा. 

आपल्या अशा छोट्या वाटणाऱ्या हातभारातून मोठ्या प्रमाणात जनजागृती होऊन यातून पुढेमागे काही दृष्टिहीनांना अमूल्य दृष्टी मिळू शकेल असा सार्थ विश्वास वाटतो.

इतर विविध प्रकारे आपण या कार्यात सहभाग देऊ शकता. त्यासाठी जरूर संपर्क साधावा. 

facebook : Shreepad Agashe ( येथेही नेत्रदानावर बरीच माहिती मिळू शकेल )

हार्दिक धन्यवाद अन शुभेच्छा!


- श्री. वि.आगाशे

टिप्पण्या

  1. श्री.श्रीपाद आगाशे हे नेत्रदानविषयक जनजागृतीचे कार्य व्याख्याने,लेखन,भित्तीपत्रके तसेच समाज माध्यमांच्या साहाय्याने गेली अनेक वर्षे करत आहेत.त्यांच्या मार्गदर्शनाखाली नेत्रदान प्रसारकार्यात सहभागी होण्यासाठी मी प्रयत्नशील आहे.धन्यवाद आणि शुभेच्छा!

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Goa

अागळ्यावेगळ्या गणेशमूर्ती

माझे ग्रंथालय ग्रंथ तुमच्या दारी