पोस्ट्स

मार्च, २०१६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

माझे ग्रंथालय ग्रंथ तुमच्या दारी

इमेज
काही माणस जन्माला येतात ते एक वेड घेउनच, एक झपाटलेपण घेऊन तर काही माणसं नोकरी, व्यवसाय, कुटुंब अशा आवर्तनात एक सुखी आयुष्य जगत असताना एक शण असा येतो की, जगण्याच्या वेगळ्या वाटेचा शोध घेताना तो एका वेड्या वळणावर येतो आणि तेथुन प्रवास सुरु होतो एका झपाटलेल्या वाटेचा ‘शहाणे करुन सोडावे सकल जन’ असा ·                      ग्रंथ तुमच्या दारी ’ या योजनेचा उगम कसा झाला ?  अशी झाली सुरवात   वाढदिवस साऱ्यांनाच हवाहवासा वाटतो. कुणी कुटुंबापुरता मर्यादित हा उत्सव ठेवतो. कुणी सामाजिक कार्याची सुरवातदेखील करतात. हाच धागा पकडून रानडे यांनी मराठी माणसाला वाढदिवसाला पुस्तकांसाठी आर्थिक देणगी कुसुमाग्रज प्रतिष्ठानला द्यावी , असे आवाहन केले. त्यास भरभरून प्रतिसाद मिळाला. वेळ , वय अथवा अंतराच्या कारणास्तव वाचनालयापर्यंत न पोचणाऱ्या वाचकांच्या दारापर्यंत ग्रंथसंपदा उपलब्ध करून दिले जाऊ लागले. एकसष्ठी , पंच्चाहत्तरी , सहस्त्रचंद्र दर्शन आणि स्मरणार्थ यातून देणगीचा ओघ वाढत गेला. विशेष म्हणजे , प्रत्येक चार महिन्यांनी ग्रंथ पेट्या बदलण्याची जबाबदारी स्थानिकांनी घेतल्याने सर्वांपर्यंत सर्व ग्रंथसं