पोस्ट्स

भटक्यांची ब्लॉगर यादी

  महाराष्ट्रामध्ये अनेक ग्रुप ट्रेक आयोजित करत असतात. अनेक भटके लोक आपले ट्रेक, भटकंतीची माहिती सगळ्यांसोबत शेअर करत असतात. त्यांचे प्रवास वर्णन वाचून देखील भटकंतीचा आनंद मिळतो. अशाच काही ब्लॉग लिहणार्या भटक्यांची ब्लॉग यादी. मराठीत लिहिणारे फारच कमी लोक आहेत. त्यात देखील सातत्य नाही. जर प्रत्येकाने आपले एक एक प्रवास वर्णन लिहले तर प्रवास ते ब्लॉगर हा आपला टप्पा पार होईल. तुम्हाला देखील माहीत असलेल्या ब्लॉगरची माहिती यात नक्की समाविष्ठ करा. http://www.pankajz.com/ https://www.makemytrip.com/blog/marathi http://www.thesolotravellers.in/category/marathi-blog/ https://davbindu.wordpress.com/ http://murkhanand.blogspot.com/ http://rohitnikam.blogspot.in/ http://kille-forts.blogspot.com/ http://sameerdivekar.blogspot.com/ http://anakalniya.blogspot.in/ http://sahyakada.blogspot.in/ http://amitjoshitrekker.blogspot.in/ http://chinmaykirtane.blogspot.in http://rajanstrekdiary.blogspot.in http://dongarwadi.blogspot.in/ http://sameerbapu.blogspot.com http://pankajtravelblog.wor

शिंगुळी : पुण्याची पारंपरिक डिश

इमेज
शिंगुळी : पुण्याची पारंपरिक डिश प्रत्येक भागाची, प्रांताची स्वतःची अशी एक  खाद्यसंस्कृती असते. कधी कधी अशी भ्रमंती करण्यात पण मजा येते. ह्या पदार्थांसोबत आपल्या काही आठवणी  जोडलेल्या असतात. माझी आजी ही शिंगुळी न तुटता संपूर्ण वेढा करत असे.  शिंगुळी ही हुलग्याच्या पिठाची बनवली जाते. याला हुलगे/ कुळीथ/ horse gram असे देखील म्हणतात. थंडीच्या दिवसात खायला उत्तम. कुळीथ हे पित्त प्रकृतीच्या लोकांनी टाळावे.  अशी ही शिंगुळी, शिंगुळे किती जणांनी खाल्ली आहे? कोणाकोणाला आवडते? किती जणांनी बनवली आहे? Discover# food culture#healthy food# something change#practice#old#yummy To connect with bhramangiri#भ्रमणगिरी  Contact us  - 9820234891 Blog :-  http://bhramangiri.blogspot.com Instagram : - https://www.instagram.com/p/CE6uN4FFKWf/?igshid=1ciqauf6dtujd Email id - madhuri.jadhav26@yahoo.co.in

Goa

GOA DIARIES आता लॉकडाऊन मधे बराच वेळ आहे म्हणुन जुणे पिकनिकचे फोटो बघत होतो. गोव्याचे जुणे फोटो बघुन गोव्याच्या सर्व पिकनिक नजरेसमोरुन गेल्या. फोटो बघुन तिकडे जाण्याची फारच इच्छा होत आहे. आता लगेच तर तिकडे जावु शकत नाही. म्हणुन हे गोवा ईबुक लिहायला घेतले. आणि तुम्हाला ही खुप वेळानंतर भेटण्याची संधी.   गोवा म्हणजेच गोमंतक हे तर पर्यटकांचे नंदनवन! लहानांपासुन मोठ्यापर्यत, देशी-विदेशी पर्यटकांना भुरळ घालणारे ठिकाण म्हणजे गो-गो-गोवा. हिमालयाचे वेड असणारे जसे पर्यटक असतात तसेच समुद्रकिनांर्याचे वेड असणार्या पर्यटकांचा मोठा वर्ग आहे. आणि ह्या गोव्याची खासियत म्हणजे येथे सर्व प्रकारचे पर्यटन आहे. गोव्यात मंदिरे, चर्च, किल्ले, सागरकिनारे,साहसी पर्यटन, टेकड्या, धबधबे, लेण्या, अभयारण्य, संग्राहलये, नाईट्लाइफ सर्व सर्व आहे. प्रत्येक पर्यटकाची हौस भागवणारी ठिकाणे येथे आहेत. म्हणुनच गोवा हे माझे सर्वात जास्त आवडते ठिकाण आहे. शिवाय येथिल सर्व ठिकाणे जवळजवळ आहेत. गोव्यामध्ये कदाचित मौजमस्ती ही सर्वात मोफत गोष्ट आपण करू शकता! मग आपण कुठे असता किंवा काय करता याला महत्त्व नाही, गोव्यामध्ये असताना मौजमस्

Mahuligad, Asangaon

Mahuligad, Asangaon

Esahity pratishtan, ई साहित्य प्रतिष्ठान

   ई साहित्य प्रतिष्ठान   मनुष्य जन्म , आई-वडील, प्राणवायू आणि ईसाहित्य प्रतिष्ठानची ईपुस्तके फुकट मिळतात. पण म्हणून त्यांना   कमी लेखाल तर ती मोठी चूक ठरेल. या वेबसाईटवर कुठेही बिनधास्त क्लिका . मोकळ्या मनाने फ़ेरफ़टका मारा. अगदी एखाद्या मंदिरात फ़िरता तसे. किंवा बागेत. सगळं फ़्री आणि ईझी.  मराठी पुस्तकं वाचा.  All Free Marathi books   कुठेही पैशाची मागणी नाही. जाहिराती नाहीत. भलत्यासलत्या हायटेक लिंक्स नाहीत, व्हायरस नाही.     इथे फ़िरा. बघा. बागडा. क्लिका. वाचा. डाऊनलोड करा. फ़्री मनाने, मनसोक्त. आत्मविश्वासाने. मराठी पुस्तक प्रेमिकांसाठी आहे हे. नियमित मराठी ई पुस्तके मिळवण्यासाठी ... आपला ई मेल पत्ता कळवा...  esahity@gmail.com   आनंद. फ़क्त घेऊ नका. द्या ! आपण डाऊनलोड केलेली मराठी ई पुस्तके वाटा. फ़्री. मेल , ब्ल्युटुथ, पेनड्राईव्ह. सीडी, कोणत्याही स्वरूपात भेट द्या. मस्त गिफ़्ट. मित्रमैत्रिणी, आई बाबा, मुलांना खुश करा.  ई पुस्तके म्हणजे केसांत माळलेली फ़ुले. किंवा कानातला अत्तराचा फ़ाया. वजन तर काहीच नाही. आणि आपल्यासोबत इतरांनाही सुखाची पखरण करत जातात.  ई पुस्तकांशी मैत्री करा

भूपतगड-प्राचीन पहारेकरी

भूपतगड-प्राचीन पहारेकरी -ओंकार ओक भूपतगड-प्राचीन पहारेकरी . . . . . ठाणे जिल्हा म्हणजे वैविध्यतेने समृद्ध अशा गडकोटांची खाणच !! केळवे-माहीमसारख्या निसर्गरम्य सागरी किल्ल्यांपासून ते अशेरी, कोहोज, तांदूळवाडीसारख्या बलदंड आणि राकट गिरीदुर्गापर्यंत अनेक सुंदर किल्ले ठाणे जिल्ह्याच्या नकाशावर आहेत. जव्हार हे ठाणे जिल्ह्यातल्या पालघर तालुक्‍यातील एक नितांत सुंदर ठिकाण !! खरं तर जव्हार हे पर्यटकांसीठीचं ""हिल स्टेशन'' असलं तरी इथल्या मुकणे राजवाड्यामुळे जव्हारला एक ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. याच जव्हारपासून फक्त 16 किलोमीटर्स वर एक अतिशय दूर्गम पण नितांतसुंदर असा गिरीदुर्ग वसला आहे... त्याचं नाव भूपतगड. जव्हारला भेट देणाऱ्या अनेकांना इतक्‍या जवळ एक किल्ला आहे याची कल्पनादेखील नसल्याने भूपतगड मात्र ट्रेकर्सच्या नकाशावरून काहीसा अदृश्‍यच झाला आहे. पण भूपतगडाचं स्थान पाहिल्यावर मात्र त्याचं भौगोलीक महत्त्व पटल्याशिवाय राहात नाही. भूपतगडाला भेट देण्यासाठी आपल्याला प्रथम जव्हार गाठावे लागते. जव्हारला जाण्यासाठी अनेक मार्ग असून त्यातील प्रचलित दोन मार्ग प्रसिद्ध आहे

अंदमान एक तीर्थक्षेत्र

अंदमान एक तीर्थक्षेत्र प्रसाद दाबके अंदमान एक तीर्थक्षेत्र  अंदमान! तसं पाहिलंच तर काय नाहीये अंदमानमध्ये...? उत्तम समुद्र किनारे, समुद्री खेळ, स्वच्छ रस्ते, उत्तम जेवण, पर्यटकांची उत्तम सोय करणारे अनेक घटक आज अंदमानात आहेत आणि तेही तुमच्या बजेटमध्ये. पण एका गोष्टीने मात्र आज अंदमानला जणू "तीर्थक्षेत्र' म्हणावं, अशी एक गोष्ट मात्र कुठल्याही पर्यटनस्थळी नाही. ती म्हणजे "सेल्युलर जेल'. तो क्रांतिकारकांचा मुकुटमणी सावरकरांनी आपली सोन्यासारखी वर्षे काळ्या पाण्याची शिक्षा भोगण्यात काढली, तेच का त्यांच्यासारखे अनेक ज्ञात-अज्ञात क्रांतिकारकांच्या स्मृतीने पावन झालेल्या या स्थळाला भेट देण्यास मीही इतरांसारखाच उत्सुक होतो . चेन्नई विमानतळावरून आमच्या विमानाने झेप घेतली आणि साधारण दोन तासांनी खिडकीतून खाली पाहिलं, तर निळ्याशार पाण्यात तरंगणारी काही बेटं दिसत होती. त्यातील काही बेटं ही निकोबारची असून, तिथे जाण्यास नागरिकांना परवानगी नाही हे अर्थात नंतर आम्हाला समजले. विमान धावपट्टीवर उतरल्यानंतर आपण जेव्हा बाहेर येतो त्या वेळेला "स्वा. विनायक दामोदर सावरकर हवाईअड्डा