नेत्रदान प्रचार-प्रसार

श्रीपाद आगाशे यांची मुलाखत श्रीपाद आगाशे - अल्प परिचय भाभा अणु संशोधन केंद्रातून निवृत्त . ३६ वेळा रक्तदान केले असून १९८१ पासून वैयक्तिक पातळीवर विविध प्रकारे नेत्रदान प्रचार-प्रसाराचे कार्य करीत आहेत . विविध प्रकारे माहिती देणे , सार्वजनिक समारंभ - सोसायट्या- शाळा महाविद्यालये - गणेशोत्सव वगैरे ठिकाणी मराठी - इंग्रजी - हिंदीमधून पाऊण तासांची व्याख्याने देणे , पोस्टर प्रदर्शने भरवणे , ग्राहक पेठा - सार्वजनिक समारंभ - सोसायट्या - रेल्वे स्थानके वगैरे ठिकाणी स्टॉल टाकणे , प्रचार साहित्याची निर्मिती करणे वगैरे उपक्रम पार पाडतात. विविध ठिकाणी सुमारे २० ० व्याख्याने दिली असून सुमारे १०० ठिकाणी स्टॉल टाकले आहेत. ४ भाषांत माहितीपत्रके तयार केली असून सुमारे सव्वा लाख माहितीपत्रके प्रसृत केली आहेत. ' डोळस दान ' ( एकांकिका ) आणि ' प्रकाशाची पहाट ' हा नेत्रदानावरील कवितांचा संग्रह प्रकाशित. मराठीतील ही एकमेवाद्वितीय अशी पुस्तके आहेत . www.netradaan.blogspot.com हा ब्लॉग चालवतात. फेसबुकवरही माहिती देण्या