पोस्ट्स

2016 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

Mahuligad, Asangaon

Mahuligad, Asangaon

Esahity pratishtan, ई साहित्य प्रतिष्ठान

   ई साहित्य प्रतिष्ठान   मनुष्य जन्म , आई-वडील, प्राणवायू आणि ईसाहित्य प्रतिष्ठानची ईपुस्तके फुकट मिळतात. पण म्हणून त्यांना   कमी लेखाल तर ती मोठी चूक ठरेल. या वेबसाईटवर कुठेही बिनधास्त क्लिका . मोकळ्या मनाने फ़ेरफ़टका मारा. अगदी एखाद्या मंदिरात फ़िरता तसे. किंवा बागेत. सगळं फ़्री आणि ईझी.  मराठी पुस्तकं वाचा.  All Free Marathi books   कुठेही पैशाची मागणी नाही. जाहिराती नाहीत. भलत्यासलत्या हायटेक लिंक्स नाहीत, व्हायरस नाही.     इथे फ़िरा. बघा. बागडा. क्लिका. वाचा. डाऊनलोड करा. फ़्री मनाने, मनसोक्त. आत्मविश्वासाने. मराठी पुस्तक प्रेमिकांसाठी आहे हे. नियमित मराठी ई पुस्तके मिळवण्यासाठी ... आपला ई मेल पत्ता कळवा...  esahity@gmail.com   आनंद. फ़क्त घेऊ नका. द्या ! आपण डाऊनलोड केलेली मराठी ई पुस्तके वाटा. फ़्री. मेल , ब्ल्युटुथ, पेनड्राईव्ह. सीडी, कोणत्याही स्वरूपात भेट द्या. मस्त गिफ़्ट. मित्रमैत्रिणी, आई बाबा, मुलांना खुश करा.  ई पुस्तके म्हणजे केसांत माळलेली फ़ुले. किंवा कानातला अत्तराचा फ़ाया. वजन तर काहीच नाही. आणि आपल्यासोबत इतरांनाही सुखाची पखरण करत जातात.  ई पुस्तकांशी मैत्री करा

भूपतगड-प्राचीन पहारेकरी

भूपतगड-प्राचीन पहारेकरी -ओंकार ओक भूपतगड-प्राचीन पहारेकरी . . . . . ठाणे जिल्हा म्हणजे वैविध्यतेने समृद्ध अशा गडकोटांची खाणच !! केळवे-माहीमसारख्या निसर्गरम्य सागरी किल्ल्यांपासून ते अशेरी, कोहोज, तांदूळवाडीसारख्या बलदंड आणि राकट गिरीदुर्गापर्यंत अनेक सुंदर किल्ले ठाणे जिल्ह्याच्या नकाशावर आहेत. जव्हार हे ठाणे जिल्ह्यातल्या पालघर तालुक्‍यातील एक नितांत सुंदर ठिकाण !! खरं तर जव्हार हे पर्यटकांसीठीचं ""हिल स्टेशन'' असलं तरी इथल्या मुकणे राजवाड्यामुळे जव्हारला एक ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. याच जव्हारपासून फक्त 16 किलोमीटर्स वर एक अतिशय दूर्गम पण नितांतसुंदर असा गिरीदुर्ग वसला आहे... त्याचं नाव भूपतगड. जव्हारला भेट देणाऱ्या अनेकांना इतक्‍या जवळ एक किल्ला आहे याची कल्पनादेखील नसल्याने भूपतगड मात्र ट्रेकर्सच्या नकाशावरून काहीसा अदृश्‍यच झाला आहे. पण भूपतगडाचं स्थान पाहिल्यावर मात्र त्याचं भौगोलीक महत्त्व पटल्याशिवाय राहात नाही. भूपतगडाला भेट देण्यासाठी आपल्याला प्रथम जव्हार गाठावे लागते. जव्हारला जाण्यासाठी अनेक मार्ग असून त्यातील प्रचलित दोन मार्ग प्रसिद्ध आहे

अंदमान एक तीर्थक्षेत्र

अंदमान एक तीर्थक्षेत्र प्रसाद दाबके अंदमान एक तीर्थक्षेत्र  अंदमान! तसं पाहिलंच तर काय नाहीये अंदमानमध्ये...? उत्तम समुद्र किनारे, समुद्री खेळ, स्वच्छ रस्ते, उत्तम जेवण, पर्यटकांची उत्तम सोय करणारे अनेक घटक आज अंदमानात आहेत आणि तेही तुमच्या बजेटमध्ये. पण एका गोष्टीने मात्र आज अंदमानला जणू "तीर्थक्षेत्र' म्हणावं, अशी एक गोष्ट मात्र कुठल्याही पर्यटनस्थळी नाही. ती म्हणजे "सेल्युलर जेल'. तो क्रांतिकारकांचा मुकुटमणी सावरकरांनी आपली सोन्यासारखी वर्षे काळ्या पाण्याची शिक्षा भोगण्यात काढली, तेच का त्यांच्यासारखे अनेक ज्ञात-अज्ञात क्रांतिकारकांच्या स्मृतीने पावन झालेल्या या स्थळाला भेट देण्यास मीही इतरांसारखाच उत्सुक होतो . चेन्नई विमानतळावरून आमच्या विमानाने झेप घेतली आणि साधारण दोन तासांनी खिडकीतून खाली पाहिलं, तर निळ्याशार पाण्यात तरंगणारी काही बेटं दिसत होती. त्यातील काही बेटं ही निकोबारची असून, तिथे जाण्यास नागरिकांना परवानगी नाही हे अर्थात नंतर आम्हाला समजले. विमान धावपट्टीवर उतरल्यानंतर आपण जेव्हा बाहेर येतो त्या वेळेला "स्वा. विनायक दामोदर सावरकर हवाईअड्डा

जुन्नरच्या उगवतीची पर्यटन स्थळे

जुन्नरच्या उगवतीची पर्यटन स्थळे मनोज हाडवळे जुन्नरच्या उगवतीची पर्यटन स्थळे  पंचमहाभुतांची ताकद आपण कोण आजमावणार? पण त्यांची अनुभूती घ्यायची असेल, तर डॉ. कार्व्हरच्या भाषेत डॉ. जगदीशचंद्र बोसांच्या बोलीत निसर्गाशी तादात्म्य पावले पाहिजे. मग बघा निसर्ग कसे आपल्या मनातील अंतरंग खोलत जातो ते. डॉ. कार्व्हर, डॉ. बोस, डॉ. सालिम अली यांची वंशावळ मारुती चित्तमपल्लींपर्यंत पोचते. आणि गंमत म्हणजे त्याला पुढे खूप साऱ्या फांद्या फुटत जातात. जुन्नरच्या भूभागावर अकरा टक्के जंगल शिल्लक आहे, सह्याद्रीच्या आठवणी सांगत जुन्नरभर फैलावलेल्या वऱ्हाडी डोंगररांगा आहेत. हे डोंगर, त्यावरून वाहणारे प्रपात, डोंगराच्या उंचीला आव्हान देणारा सोसाट्याचा वारा, कातळाच्या रंगीबेरंगी खड्यांतून सजलेल्या मातीवर मेहंदी काढावी अशा हिरवाईने नटलेल्या देवराया सगळेच त्या पंचमहाभूतांची अनुभूती देणारे. आणि या सर्वांच्या आसऱ्याने गुण्यागोविंदाने नांदत इतिहास सांगणारे दुर्गवैभव, ध्यानस्थ लेणीवैभव, भक्तिरसात मग्न मंदिरे आणि सुफियाना अंदाजातून अध्यात्म सांगणारे दर्गे आपल्याला त्याच पंचमहाभूतांची वाट दाखवतात. मग काय, एक एक ठिक

अागळ्यावेगळ्या गणेशमूर्ती

अागळ्यावेगळ्या गणेशमूर्ती अाशुतोष बापट अागळ्यावेगळ्या गणेशमूर्ती निसर्गसमृद्ध असा आपला महाराष्ट्र अनेक विविधतांनी नटलेला आहे. किल्ले-लेणी-मंदिरे ही तर इथे मोठ्या संख्येने पाहायला मिळतातच, पण त्याचसोबत कला-रूढी-परंपरा-देवता यांचीसुद्धा इथे रेलचेल आहे. शिव, देवी, गणपती ही इथली आराध्य दैवते. गणपती तर सर्वांत लोकप्रिय अशी देवता. घराघरात पूजला जाणारा हा देव आपल्याला भटकंतीमध्ये निरनिराळ्या ठिकाणी निरनिराळ्या रूपात भेटतो. कधी तो डोंगरावर आहे, तर कधी थेट समुद्रातल्या किल्ल्यात. कधी तो स्त्रीरूपात आहे, तर कधी तो चक्क झोपलेल्या स्थितीत आहे. गणेशाची ही वैशिष्ट्यपूर्ण रूपे जरा आडवाटेला गेले तर आपल्याला नक्कीच पाहायला मिळतात. त्याच त्याच गर्दीच्या ठिकाणी रेटारेटीत हा देव नाही भेटत. तो एकांतात भक्तांची वाट पाहत उभा आहे. भक्तांना साद घालतो आहे. गरज आहे त्याच्या हाकेला प्रतिसाद देऊन त्याला भेटायची. असेच काही आगळेवेगळे गणपती पाहायला बाहेर पडूयात. स्त्रीरूपातील गणेश - भुलेश्‍वर पुणे-सोलापूर रस्त्यावर असलेल्या यवतपासून अंदाजे आठ किलोमीटर अंतरावर आहे सह्याद्रीची भुलेश्‍वर रांग. शिवकाळात इथे

माझे ग्रंथालय ग्रंथ तुमच्या दारी

इमेज
काही माणस जन्माला येतात ते एक वेड घेउनच, एक झपाटलेपण घेऊन तर काही माणसं नोकरी, व्यवसाय, कुटुंब अशा आवर्तनात एक सुखी आयुष्य जगत असताना एक शण असा येतो की, जगण्याच्या वेगळ्या वाटेचा शोध घेताना तो एका वेड्या वळणावर येतो आणि तेथुन प्रवास सुरु होतो एका झपाटलेल्या वाटेचा ‘शहाणे करुन सोडावे सकल जन’ असा ·                      ग्रंथ तुमच्या दारी ’ या योजनेचा उगम कसा झाला ?  अशी झाली सुरवात   वाढदिवस साऱ्यांनाच हवाहवासा वाटतो. कुणी कुटुंबापुरता मर्यादित हा उत्सव ठेवतो. कुणी सामाजिक कार्याची सुरवातदेखील करतात. हाच धागा पकडून रानडे यांनी मराठी माणसाला वाढदिवसाला पुस्तकांसाठी आर्थिक देणगी कुसुमाग्रज प्रतिष्ठानला द्यावी , असे आवाहन केले. त्यास भरभरून प्रतिसाद मिळाला. वेळ , वय अथवा अंतराच्या कारणास्तव वाचनालयापर्यंत न पोचणाऱ्या वाचकांच्या दारापर्यंत ग्रंथसंपदा उपलब्ध करून दिले जाऊ लागले. एकसष्ठी , पंच्चाहत्तरी , सहस्त्रचंद्र दर्शन आणि स्मरणार्थ यातून देणगीचा ओघ वाढत गेला. विशेष म्हणजे , प्रत्येक चार महिन्यांनी ग्रंथ पेट्या बदलण्याची जबाबदारी स्थानिकांनी घेतल्याने सर्वांपर्यंत सर्व ग्रंथसं