माझे ग्रंथालय ग्रंथ तुमच्या दारी
काही माणस
जन्माला येतात ते एक वेड घेउनच, एक झपाटलेपण घेऊन तर काही माणसं नोकरी, व्यवसाय,
कुटुंब अशा आवर्तनात एक सुखी आयुष्य जगत असताना एक शण असा येतो की, जगण्याच्या
वेगळ्या वाटेचा शोध घेताना तो एका वेड्या वळणावर येतो आणि तेथुन प्रवास सुरु होतो
एका झपाटलेल्या वाटेचा ‘शहाणे करुन सोडावे सकल जन’ असा
·
ग्रंथ तुमच्या दारी’ या योजनेचा उगम कसा
झाला ?
अशी झाली सुरवात
वाढदिवस साऱ्यांनाच हवाहवासा वाटतो. कुणी कुटुंबापुरता मर्यादित हा उत्सव ठेवतो. कुणी सामाजिक कार्याची सुरवातदेखील करतात. हाच धागा पकडून रानडे यांनी मराठी माणसाला वाढदिवसाला पुस्तकांसाठी आर्थिक देणगी कुसुमाग्रज प्रतिष्ठानला द्यावी, असे आवाहन केले. त्यास भरभरून प्रतिसाद मिळाला. वेळ, वय अथवा अंतराच्या कारणास्तव वाचनालयापर्यंत न पोचणाऱ्या वाचकांच्या दारापर्यंत ग्रंथसंपदा उपलब्ध करून दिले जाऊ लागले. एकसष्ठी, पंच्चाहत्तरी, सहस्त्रचंद्र दर्शन आणि स्मरणार्थ यातून देणगीचा ओघ वाढत गेला. विशेष म्हणजे, प्रत्येक चार महिन्यांनी ग्रंथ पेट्या बदलण्याची जबाबदारी स्थानिकांनी घेतल्याने सर्वांपर्यंत सर्व ग्रंथसंपदा पोचण्यास मदत होत आहे.

कुसुमाग्रज प्रतिष्ठान , नाशिक या संस्थेचे
विश्वस्त श्री. विनायक रानडे यांनी सुमारे ४वर्षापूर्वी haएकच ध्यास घेतला आणि तो म्हणजे वाचकांना त्यांच्या घराजवळ उत्तम वाचनीय पुस्तके उपलब्ध
करून देण्याचा ! आणि त्यातूनच ‘ग्रंथ तुमच्या दारी या योजनेचा उगम
झाला.
·
या योजनेचे उद्दीष्ट काय आहे ?
1.
वाचन संस्कृतीचे पुंनरुज्जीवन
2.
वाचन संस्कृतीचे संवर्धन करणे
3.
लोकांमध्ये संवाद वाढवणे
4.
टीव्ही, मोबाईल, ईमेल मध्ये अडकत
चाललेल्या नव्या पिढीला वाचनाने दिशा देणे.
·
या योजनेचे थोडक्यात स्वरूप काय आहे ?
या योजनेत ३५ जणांच्या एका वाचक समूहाने सदिच्छेने काम
करण्यासाठी आपल्यातीलच एक समन्वयक (Coordinator)निवडावा.समन्वयकाने पुस्तके वाचण्यासाठी प्रतिष्टानकडे ग्रंथ पेटी
मिळण्यासाठी अर्ज करावा . अर्ज मिळाल्यावर प्रतिष्टान व समन्वयक या मध्ये एक करार होऊन वाचक समूहाच्या मागणीवरून
१०० पुस्तके असलेली पेटी प्रतिष्टानतर्फे देण्यात येईल.
·
प्रतिष्टान व समन्वयक या मधील कराराची कलमे काय आहेत
प्रतिष्टान व समन्वयक यामधील करार १०० रु. च्या मुदरांक
कागदावर (स्टॅम्पपेपर)वर केला जातो. या करारात ‘वाचकांना ग्रंथ
वाचनासाठी उपलब्ध करणे त्यांच्याकडून परत घेणे,ग्रंथ गहाळ झाल्यास अथवा फाटल्यास
त्याची छापील किमतीची भरपाई करणे इ. ‘ समन्वकावरील जबाबदारीचा उल्लेख आहे
·
१०० रु. च्या मुद्रांक कागदाचा खर्च कोणी करायचा आहे ?
१०० रु. च्या मुद्रांक कागदाचा खर्च प्रतिष्ठान करते.
·
या पेटीत फक्त
कुसुमाग्रजांचीच पुस्तके असतात काय ?
नाही.या पेटीत १०० ग्रंथ / पुस्तके ही कथा,कादंबरी ,नाटक, ललित लेख, अनुवादित ,आत्मचरित्र इ. विविध साहित्य प्रकारची, नवीन व जुन्या विविध लेखकांची असतात .
·
या पेटीतील पुस्तकांची एकूण किंमत किती ?
सरासरी रु. २०० / - प्रती पुस्तक या प्रमाणे १०० पुस्तकांची रु. २०,००० /- एवढी किंमत होते.
·
या ग्रंथ पेटयांसाठी देणगीदार कोण आहेत ?
सहकारी बँका / पत-पेढ्या,ग्रंथ, प्रकाशक या ग्रंथ पेटयांचे प्रायोजक असून काही वैयक्तिक वाचकांनी स्वताचा
वाढदिवस , लग्नाचा वाढदिवस एकसष्टी , सहस्र चंद् दर्शन अथवा आप्तजनांच्या स्मरणार्थ अश्या दिलेल्या देणग्यातून या पेटया
निर्माण झाल्या आहेत.
·
देणगी कुठे पाठविता येते ?
देणगीदाराने ‘बँक ऑर्फ बरोडाच्या’ कोणतयाही शाखेत प्रतिष्टानच्या खाली दिलेल्या खात्यावर रोख अथवा चेकने देणगी रक्कम जमा करावे नंतर प्रतिष्टानच्या कार्यालयाला बँकेत भरणा केलेल्या चलनाची
झेरॉक्स व स्वतचा पत्ता कळवा .
पत्ता : कुसुमाग्रज प्रतिष्टान,
तरण तलावामागे ,टिळकवाडी ,
नाशिक – ४२२००२,महाराष्ट्र.
Bank Details :
Bank Name - Bank ofBaroda ,
BRANCH - GOLF CLUB,
IFSC CODE- BARBOGOLFCL,
Account no – 17660100009470.
पत्ता : कुसुमाग्रज प्रतिष्टान,
तरण तलावामागे ,टिळकवाडी ,
नाशिक – ४२२००२,महाराष्ट्र.
Bank Details :
Bank Name - Bank of
BRANCH - GOLF CLUB,
IFSC CODE- BARBOGOLFCL,
Account no – 17660100009470.
·
देणगीदाराकडून किती रकमेची देणगी
स्विकारली जाते ?
एका पुस्तकाची किम्मत रु ५००/- पासून कितीही जास्त रकमेची देणगी स्वीकारली जाते.
·
देणगीदाराचे कोठे नाव येते काय ?
एक रकमी रु. २०,००० /- देणगी दाराचे पेटीवर आतील प्रत्येक १०० पुस्तकावर नावाचा स्टॅम्प लावण्यात येतो. रु. १०,००० /- चे दोन
देणगीदार असल्यास दोघांची नावे पेटीवर व आतील प्रत्येक १०० पुस्तकांवर
दोघांच्या नावाचा स्टॅम्प लावण्यात येतो . परंतु त्यापेक्षा कमी देणगीदारांची नावे जागेअभावी देणे शक्य नसते.
·
देणगीदाराला पावती देण्यात येते काय ? कश्या प्रकारे ?
होय.देणगी जर विभागीय समन्वयकाकडे
दिली असेल तर पावती सम्न्वयककडे पाठविली जाते.अथवा देणगी थेट खात्यात भरली पाठविली असल्यास देणगीदाराला नाशिक कार्यालयातून पावती पाठविण्यात येते.
·
या देणगीला आयकर खात्याची सवलत मिळते काय ?
होय. ही देणगी ’८० जी’ अंतगात आयकर सवलतीस पात्र आहे.
·
ही ग्रंथ पेटी कोठे ठेवता येते ?
आपल्या कॉलनीतील / विभागातील नागरीकांना
वाचनालय सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी आपल्या स्वताच्या जागेत/घरात,सोसायटीच्या कार्यालयात, मंदिरात अथवा अन्य सोयीच्या ठिकाणी हि ग्रंथ पेटी वाचनालय सुरू करता येते.
·
ग्रंथ पेटी वाचनालयाची वेळ काय आहे ?
ग्रंथांची देवाण घेवाण करण्याचे ठिकाण समन्वयक आणि वाचकांच्या संमतीने ठरते.
·
ही ग्रंथ पेटी किती कालावधीसाठी एका वाचक समूहाकडे ठेवता येते ?
ही ग्रंथ पेटी ४ महीने एका वाचक समूहाकडे ठेवता येते. दर ४ महिन्यानंतर प्रतिष्टानतर्फे ही पेटी दुसरया वाचक
समूहाशी अदला-बदली करून ही योजना पुढे सुरू राहते.
·
या वाचनालयास
मासिक वर्गणी आहे काय ?
मिळालेल्या देणग्यातून या पेटया निर्माण झाल्यामुळे वाचकांना मासिक शुल्क न आकारता पुस्तके देणे शक्य झाले आहे.
·
या वाचनालयात
पुस्तकांसाठी अनामत रक्कम भरणे आवश्यक आहे काय ?
नाही. परंतु वाचनालयातील पुस्तकांच्या सुरक्षेची जबाबदारी विभाग
समन्वयकावर असल्याने, त्याने सरासरी पुस्तकाच्या किमती एवढे ( म्हणजे रु. ३०० /- पर्येंत ) प्रती सभासदाकडून परत र्फेड करण्यायोग्य अनामत रक्कम घेण्यास
प्रतिष्ठानची हरकत नाही.
·
एखादे पुस्तक हरविल्यास काय करावे ?
विभाग समन्वयकाने पुस्तक हरविणरया सभासदाकडून पुस्तकाची छापील किंमत घेऊन ती रक्कम प्रतिष्ठानच्या खात्यावर रोख रक्कम भरावी .तसे
कायाालयाला कळवल्यावर तेच अथवा दुसरे पुस्तक समन्वयकाला पाठविले जाते.
·
देणगीदार असल्याने तो एखाद्या वाचकाला सभासद होण्यास विरोध करू शकतो काय ?
नाही.वाचक जर सभासदत्वासाठी आवश्यक बाबींची पूर्तता करत असतील तर त्याला सभासदत्व नाकारणे योग्य होणार नाही.
सौजन्य
अशोक काणे
मालाड समन्वयक (मुंबई -प )
अशोक काणे
मालाड समन्वयक (मुंबई -प )
माझे ग्रंथालय
ग्रंथ तुमच्या दारी योजनेचे नवे स्वरूप . . .
ग्रंथ तुमच्या दारी योजनेचे नवे स्वरूप . . .
दर्जेदार विविध विषयांची , लेखकांची २५
पुस्तकांची एक पेटी असेल,
ज्यामध्ये उत्तमोत्तम ,निवडक मराठी अथवा
इतर भाषांतील साहित्याचा मराठीत अनुवाद असलेली पुस्तके असतील .
साहित्याचे ,लेखनशैलीचे जास्तीत जास्त नमुने जसे
कथा , कादंबरी , विनोदी , रहस्य , चरित्र , प्रवासवर्णन . . . . . . थोडक्यात सर्व समावेशक ग्रंथ संपदा
देण्याचा आटोकाट प्रयत्न असेल.
एका वाचक कुटुंबाकडे सदर ग्रंथ पेटी २ महिन्यांच्या कालावधी साठी
असेल . किमान एक वाचक ते ग्रंथ पेटीतून वाचनासाठी सहजगत्या पुस्तक घेवून जावू
शकणारे जवळपास वास्तव्यास असणारे जास्तीत जास्त १० वाचकांना यामुळे वाचनाचा आनंद
घेत येईल .
योजना सुरु करताना किमान १२ ग्रंथ पेट्या विविध भागातील वाचकांसाठी
उपलब्ध व्हाव्यात .
प्रत्येक ग्रंथ पेटीतील पुस्तके वेगवेगळी असतील . कुसुमाग्रज
प्रतिष्ठान च्या निवड समिती मार्फत प्रत्येक पेटीत वैविध्यपूर्ण तसेच कोणतेही
पुस्तक दुसऱ्या पेटीत सारखे होणार नाही याची दक्षता घेतली जाते .
दर २ महिन्यांनी वाचक गटातील ग्रंथ पेटी इतर गटांसोबत बदलली जाते .
वैद्यकीय सेवा , दुकाने , कामानिमित्त भ्रमंती तसेच कारखानदारी
यामुळे कामाच्या व्यापात बुडालेल्या आमच्या मराठी वाचक बांधवांना वाचनासाठी
वाचनालयात जाणे शक्य होत नाही . पुस्तके कोणती व किती विकत घ्यावी आणि वाचून
झाल्यावर त्यांचे पुढे काय ?अथवा
ग्रंथ तुमच्या दारी योजनेत सहभागी होण्यासाठी ३५ वाचकांचा समूह होवू न शकणे . अशा
वाचन प्रेमींसाठी ग्रंथ तुमच्या दारी योजनेचे माझे ग्रंथालय हा नवा उपक्रम ठाणे , मुंबई , नाशिक , पुणे . . . कालांतराने सर्व शहरात सुरु
करीत आहोत.
नाशिकचे माझे मित्र संजीव खत्री आणि आशिष जोशी
यांनी बनवलेली झकास ग्रंथ पेटी . . .
२१ ग्रंथ संच
घेवून येतोय . . .
" माझ ग्रंथालय
" ठाणे
शुभारंभ सकाळी ११
वाजता रविवार ३१ ऑगस्ट २०१४ रोजी
आनंद विश्व
गुरुकुल , रघुनाथ नगर , मित्तल पार्क जवळ , ठाणे येथे
कुसुमाग्रज
प्रतिष्ठानचे अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक यांच्या शुभहस्ते होणार आहे .
माझ
ग्रंथालय योजनेत २१ पेट्यांचे तसेच ग्रंथ तुमच्या दारी योजनेतील ग्रंथ पेट्यांचे वितरण
होणार आहे .
वाचन
प्रेमींनी योजनेत सहभागी होण्यासाठी अवश्य उपस्थित राहावे .
अधिक
माहिती व नावनोंदणीसाठी संपर्क :
९७ ६९
९२ ९७ ८५ अरविंद जोशी ,
समन्वयक , माझ ग्रंथालय , ठाणे विभाग .
९८ ६९
४६ ५१ ४४ सौ रश्मी जोशी ,
समन्वयक , ग्रंथ तुमच्या दारी , ठाणे विभाग .
विनायक
रानडे , विश्वस्थ
, कुसुमाग्रज
प्रतिष्ठान , नाशिक
, महाराष्ट्र
, भारत
माझं ग्रंथालय बालविभाग- राजीव तांबेंच्या कार्यशाळेचा केलेला वृत्तांत
:
बालपण हे दर पिढीगणिक सतत बदलतं असतं . आमच्या वेळी नव्हतं बुवा
असं , हे पालुपद घरोघरी मातीच्या चुलींसोबत टांगलेलंच असावं. आत्ताची
मुलं आणि त्यांचे आई-वडिल यांच्यात मात्र ही जनरेशन गॅप जरा जास्तच. माहिती
तंत्रज्ञानाच्या युगात उपलब्ध असणारी अनेकोनेक नवनवी गॅजेट्स , मोबाइल्स, इंटरनेट या आभासी दुनियेत चटकन रमणाऱ्या या पिढीचे प्रश्नही वेगळे.
पालकत्त्व , विवेकी पालकत्त्व , मुलांचं मानसशास्त्र , क्वालिटी टाईम , न्युक्लियर फॅमिली वगैरे शब्द हे आज
सातत्याने नजरेसमोर येतात . हल्ली टिव्हीवर , वृत्तपत्रांमधून मुलं आणि
त्यांच्याबद्दलचे लहानमोठे प्रश्न याबद्दल साधकबाधक चर्चासत्र सतत होत असतात.
करमणूकीच्या भरमसाट साधनांची रेलचेल नसणाऱ्या पिढीत सुट्टी किंवा
मोकळा वेळ हा दंगामस्ती आणि वाचनासाठीचा होता. आज चित्र पालटतय. अशावेळी मुलांना
वाचनाची गोडी निर्माण व्हावी यासाठी कुसुमाग्रज प्रतिष्ठानाने ’माझे ग्रंथालय’ बालविभागाद्वारे या मुलांसाठी एक
अनोखी वाचक चळवळ सुरू केली आणि या चळवळीला पालकांचा आणि बालदोस्तांचा उदंड
प्रतिसादही लाभला.
’२१ अपेक्षित प्रश्नसंच ’- ओळखीचा वाटतोय किनई हा शब्द . पण आज चौफेर मुशाफिरी करणाऱ्या या
चिमुरड्यांच्या मेंदूच्या कारखान्यात निर्माण होणाऱ्या २१, २१० ते २१०० ’अनपेक्षित’ प्रश्नांच्या फैऱ्यांना तोंड देतांना पालकांची मात्र दमछाक होते.
आणि मग आपल्यालाही एखादे गाईड मिळाले तर काय मदत होईल नाही असा विचार मनात
डोकावल्याशिवाय रहात नाही. या गाईडमंडळींमधे अग्रक्रमाने नाव येते ते श्री. राजीव
तांबे यांचे.
’माझे ग्रंथालय’ बालविभागाच्या स्थापनेनंतरच्या पहिल्याच कार्यक्रमाला राजीवजी
प्रमुख पाहूणे म्हणून येणार ही बातमी सगळ्यांसाठीच आनंदाची होती. राजीवजी
युनिसेफसाठी शिक्षण सल्लागार आहेत, अभ्यासक्रम समितीचे ते सदस्य आहेत, राष्ट्रीय शैक्षणिक आराखडा पुनर्विलोकन समितीचे सदस्य, केंद्र-राज्य शासनाचे अनेक पुरस्कार मिळवणारे तसेच कथा, कविता, पालकत्त्व अश्या अनेक विषयांवर ६९ पुस्तके लिहीणारे ही ओळख आहेच
मात्र बच्चेकंपनी त्यांना ओळखते ते ’गंमतशाळा’ चालवणारे त्यांचे ’दोस्त’ राजीवकाका म्हणून.
राजीवजी दोन मुद्द्यांवर पालकांशी आणि बालदोस्तांशी बोलले. ’अभ्यास आणि वाचन’ व ’परिक्षेला जाता जाता ’ . ८ मार्च रोजी ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
राजीवजी दोन मुद्द्यांवर पालकांशी आणि बालदोस्तांशी बोलले. ’अभ्यास आणि वाचन’ व ’परिक्षेला जाता जाता ’ . ८ मार्च रोजी ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
मुलांना समजेल ,रुचेल, त्यांना त्यांची अगदी आपलीशी वाटेल
अश्या भाषेत साधे सोपे असे पण अर्थपूर्ण मार्गदर्शन ही राजीवजींची खासियत. सहज
साध्या सोप्या दाखल्यांतून त्यांनी बालग्रंथालयाच्या पालक आणि बच्चेकंपनीशी संवाद
साधला. खुसखुशीत उदाहरणांमधून आपल्या पालकांना ’इंजेक्शन’रूपी टोचणी देणारे राजीवकाका क्षणार्धात बच्चेकंपनीचे आपले झाले.
पालकांनी भूतकाळात न जगता मुलांच्या वर्तमानात त्यांच्यासोबत असावे. मुलांना ’लेबल’ लावू नका तसेच मुलांना त्यांची चूक दाखवून न देता काय बरोबर हे
मात्र वारंवार सांगा असे मुद्दे राजीवजींनी मांडले. वाचनाचे महत्त्व, वाचन वाढल्यास भाषासमृद्धी वाढून त्याचा विचारक्षमता वाढवण्यात कसा
हातभार लागतो हे ही त्यांनी अगदी सहज मुलांना उलगडून दाखवले.
दिलखूलास हसणारी मुलं आणि वक्त्याकडून आपल्या वागणूकीतल्या
दोषांबद्दल आरसा समोर धरून चिमटे काढले जात असले तरी त्याचं मर्म अलगद समजलेला
पालकवर्ग हे कार्यशाळेचे महत्त्वाचे यश जाणवत होते. आजच्या दिनचर्येत मुलांना आधिच
इतकी धावपळ असते की ते वाचनाकडे चटकन वळत नाहीत , मात्र या कार्यशाळेनंतर मुलांना
वाचावेसे नक्की वाटेल.
कृतीमधे बदल हवा असेल तर आपण मनाला देत असलेला ’इनपुट ’ बदलायला हवा हे समजावताना राजीवजी म्हणाले की आपण मनाला सकारात्मक
इनपुट दिला असता आपली भाषा बदललेली असते , भाषा बदलली की त्या अनुषंगाने येणारे
विचार बदलतात आणि विचारांद्वारे आपली कृतीदेखील सकारात्मक होते. सभाधीटपणाबद्दल
बोलताना ते म्हणाले, आपण मनाला सतत सांगायला हवे की मी जे योग्य ते, बरोबर तेच करणार. लोक माझ्या झालेल्या एखाद्या चुकीला हसले तर हसू
देत. स्टेजवरून बोलताना मी कुठे कमी पडलॊ तरी मी स्टेजवर आहे आणि एकदिवस नक्कीच
यशस्वी होणार मात्र हसणारी लोकं ही प्रेक्षकात होती आणि तिथेच असतीलही.
परिक्षेबद्दल येणाऱ्या तणावावर मात करण्यासाठी मार्गदर्शन करताना
राजीवजींनी मुलांना सांगितले की प्रश्नपत्रिका हातात आली आणि एखाद्या प्रश्नाचे
उत्तर येत नसले की आपण घाबरून जातो आणि येणाऱ्या तणावात आपल्याला येत असलेली
उत्तरं देखील चुकवतो. अश्यावेळी आपण मनाला शांत ठेवत , येणाऱ्या उत्तरांबद्दल आधी स्वत:ला शाबासकी देत , आत्ता येत नसलेले उत्तर देखील मला येणारच असा सकारात्मक विचार केल्यास हळूहळू उत्तरं आठवत जाईल व तणावमुक्त पद्धतीने सहज परीक्षा
पार पडॆल.
सोप्या आणि ओघवत्या भाषेत केले गेलेले, मुलांच्या रोजच्या आयुष्यातल्या गणितातले दाखले दिलेले, पालकांना नक्की कसे वागले पाहिजे याबद्दल सांगणारे राजीवजींचे शब्द
उपस्थितांच्या ’दिमाग मे फिट’ नक्कीच झाले असतील.पालक आणि
पाल्यांमधली दरी कमी व्हायला मदत होइल. तसेच ’तू छान वागलास हं’ , ’आत्ता नाही जमले तर पुन्हा प्रयत्न कर’ , ’शाब्बास’ अशी ’अमराठी’ वाक्य पालक घरोघरी उच्चारू लागतील याबद्दल शंका नाही.
या कार्यशाळेच्या यशात कुसुमाग्रज प्रतिष्ठानाच्या विश्वस्त सौ.विनिता धारकर, श्री.विनायक रानडे तसेच बालग्रंथालयाच्या समन्वयक सौ. स्वाती गोरवाडकर यांनी परिश्रम घेतले. आलेल्या छोट्या दोस्तांना सुकामेव्याचा खाऊ देण्याची जबाबदारी श्री.कौस्तुभ मेहेता यांनी उचलली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. विनायक रानडे यांनी केले. सौ. मधुरा दिवाकर यांनी कार्यक्रमाची सुरूवात सुमधुर इशस्तवनाने केली. तर सुत्रसंचालन डॉ कौसर तांबोळींनी केले. सौ.तन्वी देवडे यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. उपस्थित लहान मुलांना त्यांची पुस्तकांची बॅग देण्यात सौ. रश्मी दांडेकरांचं सहकार्य होतं. कुसुमाग्रज प्रतिष्ठानातील कर्मचारी वर्गाने संपूर्ण कार्यालयीन भार पेलला. श्री. अरूण नातू यांनी उपस्थितांच्या अल्पोपहाराची व्यवस्था चोख ठेवली. तसेच उपस्थित तमाम श्रोत्यांच्या टाळ्यांनी आणि खळखळून हसण्याने कार्यक्रमाची रंगत वाढवली.

कुसुमाग्रज प्रतिष्ठान बालग्रंथालय या योजने अंतर्गत उत्तमोत्तम
निवडक अश्या एकूण २५ पुस्तकांची एक बॅग प्रत्येकास देण्यात येत असून त्यात १५
मराठी आणि १० इंग्लिश पुस्तकं आहेत. माझं ग्रंथालय बालविभागाचे सदस्यत्व
घेण्यासाठी ठराविक देणगीमुल्य कुसुमाग्रज प्रतिष्ठानास देण्यात येते. सामाजिक
मुल्यांची जपणूक करत या बालग्रंथालयातली पहिली पेटी माई लेले श्रवण विकास
विद्यालयाला देण्यात आली होती. तसेच राजीव तांबेंच्या हस्ते माइलस्टोन या
ऑटिझमच्या विद्यार्थ्यांच्या शाळेस एक पेटी देण्यात आली.
दिवसेंदिवस बहणारा हा बालवाचकांचा मेळावा आणि त्यासाठी राजीव
तांबेंसारख्या बालकांच्या ’दोस्तांचे’ लाभणारे सहकार्य पहाता या रोपट्याचे लवकरच एखाद्या वटवृक्षात
रुपांतर होइल याबद्दल निश्चित खात्री वाटते.
माझं ग्रंथालय , बालविभाग
२५ ग्रंथ पेट्या प्रत्येकी १५ मराठी व १० इंग्रजी अशी एकूण २५ पुस्तके
दर दोन महिन्यांनी आपापसात बदलणे …
सभासद होण्यासाठी देणगी मुल्य .
साहित्याचा खजिना असलेली फिरती ग्रंथ पेटी
मुलांना वाढदिवसाला भेट देण्यासाठी ऊतम .
समन्वयक : संगीता राजपाठक
09987791854
Sangeeta Rajpathak

अधिक माहितीसाठी संपर्क करा.
विनायक रानडे, विश्वस्त, कुसुमाग्रज प्रतिष्ठान
विनायक रानडे, विश्वस्त, कुसुमाग्रज प्रतिष्ठान
वाचक प्रतिक्रिया
ग्रंथ तुमच्या दारी मुळे गुरु भेट
मी ग्रंथ तुमच्या दारीची एक समन्वयक. मी नेहमी पेटीतील पुस्तके माझ्या ऑफिसमध्ये माझ्या सहकारयाना वाचायला घेऊन जाते. त्या दिवशी एका मैत्रिणीने मागीतले म्हणून अभिमन्यू पत्नी उत्तरा -सुधाकर शुक्ला यांचे पुस्तक घेऊन गेले. पण तिला देण्याआधी मी ते पुस्तक वाचयचे ठरवले थोडा स्वार्थी होता विचार पण कधीतरी चालते ना असे तसेच हे. तसे हि मला ऐतिहासिक वाचायला आवडते.
पुस्तक हातात घेतले आणि सहज शेवटचे पान उघडून बघितले तर लेखकाचा फोटो आणि माहिती होती. तो फोटो बघून स्वतःशी म्हणाले अरे हे तर शुक्ला सर. पण तेच हे कि आणखी कोणी असे एकदा वाटून गेले. सगळ्यात शेवटी माहिती दिली होती " प्रिन्सेस पद्मराजे गर्ल्स हाय स्कूल मधून निवृत्ती " मग तर माझी खात्रीच पटली कि हे तर आपले मराठीचे शुक्ला सर. त्या माहिती मध्ये घरचा नंबर हि दिला होता.
मनात विचार आला कि फोन करून बघावा. थोडी भीती वाटत होती पण फोन लावला आणि सर आहेत का ते विचारले पण सर बाहेर गेले होते. संध्याकाळ पर्येंत मी शाळेच्या विचारात होते. मराठीचा तास चालू होता आणि सर शिकवत होते मन भूतकाळात रमून गेले होते. सगळ्या आठवणी समोर दिसू लागल्या होत्या. शुक्ला सर आणि त्यांनी शिकवलेल्या आर्या डोळ्यासमोर उभ्या राहिल्या.
ऑफिस संपल्यावर संध्याकाळी परत सरांना फोन केला मी. सर आले फोनवर त्यांचे वय आता ८० वर्ष आहे. मला खरेच शब्द सुचत नव्हते. काय बोलू कळत नव्हते. इतक्या वर्षांनी आपण आपल्या मराठी च्या सरांशी बोलू याची मला कल्पनाच नव्हती पण ते खरे झाले होते.
बराच वेळ बोललो आम्ही सर सांगत होते त्यांनी काय काय लिहिले ते. मग म्हणाले कि पुण्याला आलीस कि ये घरी नक्की. माझ्या घरच्यांची विचारपूस केली. बोलता बोलता माझ्या डोळ्यात पाणी कधी आले कळलेच नाही. मी किती जणांना सांगत सुटले कि मी माझ्या सरांशी बोलले म्हणून खूप आनंद झाला .ग्रंथ तुमच्या दारी च्या योजनेमुळे सरांशी बोलण्याचे भाग्य मला लाभले.
रसिका गुळवणी
समन्वयक , नवी मुंबई खारघर
समन्वयक , नवी मुंबई खारघर
नागपूर एच बी इस्टेट वाचक प्रतिक्रिया
अतिशय सुंदर उपक्रम या उपक्रमामुळे माझ्या मुलीत वाचनाची आवड
निर्माण होते आहे.
सौ भक्ती प्रसाद बर्वे
एक सुंदर उपक्रम वाचनाची आवड निर्माण करण्यास मदत.
एक सुंदर उपक्रम वाचनाची आवड निर्माण करण्यास मदत.
सौ वैदेही अमोल वझे
अतिशय स्तुत्य उपक्रम विविध प्रकारची पुस्तके सहज उपलब्ध सौ गोखले यांचे व्यवस्थापन नेटके.
अतिशय स्तुत्य उपक्रम विविध प्रकारची पुस्तके सहज उपलब्ध सौ गोखले यांचे व्यवस्थापन नेटके.
श्रीमती गोडबोले
गेले तीन महिने मी या ग्रंथ तुमच्या दारी या उपक्रमाचा फायदा घेतला. पुस्तके सर्व नवीन आणि व्यवस्थित ठेवलेली त्यामुळे वाचण्याचा आनंद द्विगुणीत झाला. सौ गोखले यांचे सहकार्य पण कौतुकास्पद पुढील वाटचालीला शुभेच्छा.

द वा आपटे
निस्वार्थ मानाने केलेली समाज सेवा म्हणजे काय याचे उत्तर हवे असेल तर ग्रंथ तुमच्या दारी सारखा उपक्रम करा
निस्वार्थ मानाने केलेली समाज सेवा म्हणजे काय याचे उत्तर हवे असेल तर ग्रंथ तुमच्या दारी सारखा उपक्रम करा
सौ रुपाली पडगीलवार
मुलुंड वाचक प्रतिक्रिया
साहित्य म्हणजे अनुभव , भावना, विचार,वेदना,प्रतिक्रिया यांना
दिलेले शब्दरूप , मग त्यासाठी कोणताही साहित्यप्रकार
मनोधारणेनुसार निवडता येतो. उदा. कथा कादंबरी, आत्मचरित्र वगैरे
आकलन व संवेदना वाढवण्याचे प्रयत्न साहित्याद्वारे होतात म्हणून साहित्य
निर्मितीचे महत्व आहे. साहित्यातील ताकद आपण वाचनातून अनुभवली आहे. त्याला कोणताही
विषय वर्ज्य नाही. अशीच विविध विषयांची पुस्तके कुसुमाग्रज प्रतिष्ठान , नाशिक यांच्या ग्रंथ तुमच्या दारी या संकल्पनेतून आमच्या दारी आली. नव
नवीन पुस्तके वाचताना विचारांचा झोका इतका उंच जातो कि तो खाली यायलाच तयार नसतो.
विविध भाषांमधील अनुवादित पुस्तके देश विदेशातील राजकीय, सामाजिक विचार वेदना यांची जाणीव करून देतात.
या प्रकल्पाला मिळालेला प्रतिसाद म्हणजे मराठी माणसाचे साहित्यावर असेलेले प्रेमच व्यक्त करणे होय. असे प्रकल्प राबवण्याचा विचार मनात येणारयाना व तो प्रत्यक्षात उतरवताना त्यांना सहकार्याचे हात देणाऱ्या सर्वांना माझे त्रिवार वंदन
सौ मधुरा सुधीर महंत
मुलुंड वाचक

ग्रंथ तुमच्या दारी प्रतिक्रिया बेळगाव
ग्रंथ तुमच्या दारी कुसुमाग्रज प्रतिष्ठान तर्फे विनासायास विनामोबदला ग्रंथ तुमच्या
दारी हा उपक्रम गावो-गावी आणि म्हणूनच घरो-घरी नेणारे विश्वस्थ आणि एक
ग्रन्थ-प्रेमी तथा एक समर्पित कार्यकर्ते हे बेळगावला येत अहेत हे वाचून खूप-खूप -
आनंद झाला . लोकमान्य तर्फे अनेक साहित्यिकांना भेटण्याची संधी बेळगावात मिळत असते तेंव्हा श्री विनायक रानडे ना
भेटणे आणि त्यांची ग्रंथ तुमच्या दारी ही योजना समजून घेणे आणि तिला शक्य होईल
तेवढा सकारात्मक प्रतिसाद एवं सहयोग देणे हे बेळगावातील मराठी -प्रेमी संस्थांनी
जरूर कराव . बेळगावच्या परिसरात अनेक मराठी साहित्य सम्मेलने होत असतात त्यांच्या
संस्थांनी ही योजना जरूर राबवावी
.Facebook वरून मला या योजनेची एक वर्षा पूर्वी माहिती मिळाली आणि श्री विनायक रानडे हे ज्या समर्पित भावनेने प्रवास करीत असतात आणि ही योजना हा उपक्रम गावो-गावी नेत असतात तो तडाखा ती तडफ पाहून मी त्यांच्याशी संपर्क साधला .ते या उपक्रमाविषयी भर-भरून बोलले तेंव्हा कळून चुकल की या माणसात ग्रन्थ आणि ते सर्व दुर जावे या साठी किती तळमळ आहे .
श्रीविनायक रानडे हे आता माझे इंटरनेट वरून झालेले एक मित्र आहेत अस मी अगदी अभिमानानी म्हणू शकतो . त्यांच्या या उपक्रमाला मी tv च्या भाषेत DTH सेवा अस म्हणेन म्हणजेच direct to home (but free ). कर्नाटकात असलेल्या वेग-वेगळ्या मराठी संस्थाना आणि मराठी मंडळानीही ही योजना हा उपक्रम राबवावा यासाठी धारवाड ,हुबळी ,गुलबर्गा ,मंगळूरू (मी मंगळूरू मराठी मंडळाचा संस्थापक सदस्य आहे ),बेगलुरू या व अशा अनेक ठिकाणी त्यांचा जाण्याचा मानस आहे या त्यांच्या कार्यात हि आपण बेळगावकरांनी मदत करायला हवी अस मला वाटत . श्री विनायक रानडेजीच आणि त्यांच्या उपक्रमाच स्वागत आणि मनापसून शुभेछा …
क़िशोर मधुकर काकडे -मंगळूरकर

.
आनंदवनात ग्रंथपेटी -
बाबा आमटे जन्मशताब्दी वर्षानिमित्त वितरीत .
लीना फलके , तहसीलदार , कुही ९ ८ ६ ० ३ २ ९ ० ५ ० यांच्या सक्रिय पुढाकाराने
ग्रंथ तुमच्या दारी योजनेतील १ ग्रंथ पेटी नागपुर जवळील कुही गावामध्ये : तहसीलदार कार्यालयात .
प्रथमच अशा छोट्या गावात तेही शासकीय अधिकाऱ्याच्या पुढाकाराने शासकीय कचेरीत
गावकऱ्यांच्या समग्र विकासासाठी घेतलेल्या पुढाकार बद्दल लीना फलके यांचे अभिनंदन व आभार .
मराठी वाचक जेथे , ग्रंथ तुमच्या दारी तेथे .
ग्रंथ तुमच्या दारी ची विक्रमी घोडदौड . . .
महाराष्ट्र , गुजराथ , दिल्ली , सिल्व्हास, कर्नाटक तसेच भारताबाहेर दुबई . . .
लवकरच अनेक राज्यात , देशात . . .
पेटी पोहोचली आता खोक्या पर्यंत ( १ कोटी रुपये ) ५०० पेट्या
आपल्या परिचित असलेल्या वाचकांना सदरची माहिती पाठवून योजना विस्तारास सहकार्य कराल. ग्रंथ तुमच्या दारी योजनेस आपला सक्रिय सहभाग आहेच तो वृद्धिंगत होईल या सकारात्मक प्रतिसादाच्या अपेक्षेत .
अधिक माहितीसाठी संपर्क करा.
विनायक रानडे, विश्वस्त, कुसुमाग्रज प्रतिष्ठान
ग्रंथ तुमच्या दारी ची विक्रमी घोडदौड . . .
महाराष्ट्र , गुजराथ , दिल्ली , सिल्व्हास, कर्नाटक तसेच भारताबाहेर दुबई . . .
लवकरच अनेक राज्यात , देशात . . .
पेटी पोहोचली आता खोक्या पर्यंत ( १ कोटी रुपये ) ५०० पेट्या
आपल्या परिचित असलेल्या वाचकांना सदरची माहिती पाठवून योजना विस्तारास सहकार्य कराल. ग्रंथ तुमच्या दारी योजनेस आपला सक्रिय सहभाग आहेच तो वृद्धिंगत होईल या सकारात्मक प्रतिसादाच्या अपेक्षेत .
अधिक माहितीसाठी संपर्क करा.
विनायक रानडे, विश्वस्त, कुसुमाग्रज प्रतिष्ठान
सुवर्ण ग्रंथ पेटी’ सोहळा
'ग्रंथ तुमच्या दारी' योजनेचा उद्या कार्यक्रम
सध्याच्या तरुण पिढीत फेसबुकसारख्या सोशल नेटवर्किंग साइट्स, ईमेल, चॅटिंग तसेच टीव्ही, मोबाइल आदींचा अतिवापर होत आहे. त्यांच्यात वाचनाची आवड निर्माण व्हावी, वाचनसंस्कृतीचे पुनरुज्जीवन आणि संवर्धन व्हावे तसेच परस्परांत संवाद वाढावा या हेतूने सुरू केलेल्या ग्रंथ तुमच्या दारी या पुस्तक पेटी योजनेचा मुंबईतील सुवर्ण ग्रंथपेटी सोहळा उद्या, रविवार, ८ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे.
नाशिकचे कुसुमाग्रज प्रतिष्ठान यांची 'ग्रंथ तुमच्या दारी' ही पुस्तक पेटी वाचनालय योजना आहे. मुंबई पश्चिम विभागातर्फे, पश्चिम शहर आणि उपनगरात ही योजना राबविली जाते. त्यासाठी मुख्य व विभागीय समन्वयक असे स्वेच्छेने काम करणारे अनेक स्वयंसेवक लाभल्यामुळे पाच ग्रंथ पेट्यांनी गोरेगाव येथे सुरू झालेली ही योजना दोन वर्षांच्या अवधीत दहा पटींपेक्षा जास्त वाढून ५०वर पोहोचली आहे. शाळा, सोसायट्यांचे ऑफिस, डिस्पेन्सरी, मंदिर, घर आदी वाचकांच्या सोयीच्या ठिकाणी या पेट्या ठेवल्या आहेत.
या ५०व्या पेटीच्या निमित्ताने उद्या, रविवारी सायंकाळी पाच वाजता गोरेगाव पूर्व येथे प्रज्ञाप्रबोधिनी शाळेच्या पहिल्या मजल्यावरील सभागृहात 'सुवर्ण ग्रंथ पेटी' सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यास ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक, कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे विश्वस्त विनायक रानडे, कवी अशोक नायगांवकर, वामन हरी पेठे ज्वेलर्सचे विश्वनाथ पेठे उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्यास रसिकांनी आवर्जून उपस्थित रहावे, असे आवाहन Mahesh Abhyankar डॉ. महेश अभ्यंकर (९८२०४५०९८६) आणि अशोक काणे Ashok Kane(९८६९२४०५२६) यांनी केले आहे.

चला बेळगाव साठी ग्रंथ तुमच्या दारी
च्या ९ ग्रंथ पेट्यांची तयारी जोरात सुरु आहे .
योजनेचा शुभारंभ मधु मंगेश कर्णिक यांच्या शुभ हस्ते २० सप्टेंबर रोजी संध्याकाळी ६ वाजता .
ग्रंथ दौरा १९ ते २१ सप्टेंबर - पुणे , कोल्हापूर , बेळगाव . . . आणि गोवा
योजनेचा शुभारंभ मधु मंगेश कर्णिक यांच्या शुभ हस्ते २० सप्टेंबर रोजी संध्याकाळी ६ वाजता .
ग्रंथ दौरा १९ ते २१ सप्टेंबर - पुणे , कोल्हापूर , बेळगाव . . . आणि गोवा
नेदरलॅंडमध्ये फडकणार मराठी
ग्रंथसंपदेचा झेंडा
- महेंद्र महाजन / सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 1 नोव्हेंबर 2014
नाशिक - कुसुमाग्रज प्रतिष्ठानने वाचन संस्कृतीला बळ देण्यासाठी सुरू केलेला "ग्रंथ तुमच्या दारी‘ उपक्रम महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली, कर्नाटक, सिल्व्हासा मार्गे दुबई, ओमान, बहारिनमध्ये पोचलायं. हाच उपक्रम आता पुढचं पाऊल टाकत असून कथा, कादंबरी, विनोदी, रहस्य, व्यक्तिचरित्र, अनुवादित असे विविध प्रकारचे साहित्य प्रकार नेदरलॅंडमध्ये पोचणार आहेत. त्यासाठी नेदरलॅंडमधील महाराष्ट्र मंडळाने पुढाकार घेतलाय.
मुंबईमधील गौरी आणि विनय कुलकर्णी हे नेदरलॅंडमध्ये स्थायिक झाले आहेत. या दाम्पत्याने मराठी माणसांसाठी आपल्या आवडत्या साहित्यिकांची ग्रंथसंपदा उपलब्ध व्हावी, अशी विनंती प्रतिष्ठानच्या वाचनालय समितीचे अध्यक्ष विनायक रानडे यांना केली. त्यानुसार प्रत्येकी 25 ग्रंथसंपदेच्या 12 पेट्या प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर रानडे हे नेदरलॅंडमध्ये पोचवणार आहेत. त्यातील आठ पेट्या नेदरलॅंडमधील महाराष्ट्र मंडळाने प्रायोजित केल्या आहेत, तर चार पेट्यांची भेट नाशिकमधील उद्योजक श्रीरंग सारडा यांच्या देणगीतून दिल्या जाणार आहेत. उपक्रमाची मुहूर्तमेढ 2009 मध्ये 11 पेट्यांनी नाशिकमध्ये रोवली गेली. आतापर्यंत वाचन संस्कृतीची हीच चळवळ 521 पेट्यांपर्यंत पोचली असून ग्रंथसंपदा सव्वाकोटी रुपयांची झाली आहे. महाराष्ट्राबाहेर अनेक ठिकाणी विविध महाराष्ट्र मंडळे हा प्रकल्प राबवत आहेत. त्यात मात्र नेदरलॅंडमधील महाराष्ट्र मंडळाने वाचन संस्कृतीला बळकटी देणारा उपक्रम राबवण्याचे ठरवले, असे सांगून रानडे म्हणाले, की नेदरलॅंडमध्ये सुरू होणारी ही वाचन संस्कृतीची चळवळ युरोपभर विस्तारित होणार आहे.
सुवर्ण ग्रंथ पेटी’ सोहळा
'ग्रंथ तुमच्या दारी' योजनेचा उद्या कार्यक्रम
सध्याच्या तरुण पिढीत फेसबुकसारख्या सोशल नेटवर्किंग साइट्स, ईमेल, चॅटिंग तसेच टीव्ही, मोबाइल आदींचा अतिवापर होत आहे. त्यांच्यात वाचनाची आवड निर्माण व्हावी, वाचनसंस्कृतीचे पुनरुज्जीवन आणि संवर्धन व्हावे तसेच परस्परांत संवाद वाढावा या हेतूने सुरू केलेल्या ग्रंथ तुमच्या दारी या पुस्तक पेटी योजनेचा मुंबईतील सुवर्ण ग्रंथपेटी सोहळा उद्या, रविवार, ८ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे.
नाशिकचे कुसुमाग्रज प्रतिष्ठान यांची 'ग्रंथ तुमच्या दारी' ही पुस्तक पेटी वाचनालय योजना आहे. मुंबई पश्चिम विभागातर्फे, पश्चिम शहर आणि उपनगरात ही योजना राबविली जाते. त्यासाठी मुख्य व विभागीय समन्वयक असे स्वेच्छेने काम करणारे अनेक स्वयंसेवक लाभल्यामुळे पाच ग्रंथ पेट्यांनी गोरेगाव येथे सुरू झालेली ही योजना दोन वर्षांच्या अवधीत दहा पटींपेक्षा जास्त वाढून ५०वर पोहोचली आहे. शाळा, सोसायट्यांचे ऑफिस, डिस्पेन्सरी, मंदिर, घर आदी वाचकांच्या सोयीच्या ठिकाणी या पेट्या ठेवल्या आहेत.
या ५०व्या पेटीच्या निमित्ताने उद्या, रविवारी सायंकाळी पाच वाजता गोरेगाव पूर्व येथे प्रज्ञाप्रबोधिनी शाळेच्या पहिल्या मजल्यावरील सभागृहात 'सुवर्ण ग्रंथ पेटी' सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यास ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक, कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे विश्वस्त विनायक रानडे, कवी अशोक नायगांवकर, वामन हरी पेठे ज्वेलर्सचे विश्वनाथ पेठे उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्यास रसिकांनी आवर्जून उपस्थित रहावे, असे आवाहन Mahesh Abhyankar डॉ. महेश अभ्यंकर (९८२०४५०९८६) आणि अशोक काणे Ashok Kane(९८६९२४०५२६) यांनी केले आहे.
- महेंद्र महाजन / सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 1 नोव्हेंबर 2014
नाशिक - कुसुमाग्रज प्रतिष्ठानने वाचन संस्कृतीला बळ देण्यासाठी सुरू केलेला "ग्रंथ तुमच्या दारी‘ उपक्रम महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली, कर्नाटक, सिल्व्हासा मार्गे दुबई, ओमान, बहारिनमध्ये पोचलायं. हाच उपक्रम आता पुढचं पाऊल टाकत असून कथा, कादंबरी, विनोदी, रहस्य, व्यक्तिचरित्र, अनुवादित असे विविध प्रकारचे साहित्य प्रकार नेदरलॅंडमध्ये पोचणार आहेत. त्यासाठी नेदरलॅंडमधील महाराष्ट्र मंडळाने पुढाकार घेतलाय.
मुंबईमधील गौरी आणि विनय कुलकर्णी हे नेदरलॅंडमध्ये स्थायिक झाले आहेत. या दाम्पत्याने मराठी माणसांसाठी आपल्या आवडत्या साहित्यिकांची ग्रंथसंपदा उपलब्ध व्हावी, अशी विनंती प्रतिष्ठानच्या वाचनालय समितीचे अध्यक्ष विनायक रानडे यांना केली. त्यानुसार प्रत्येकी 25 ग्रंथसंपदेच्या 12 पेट्या प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर रानडे हे नेदरलॅंडमध्ये पोचवणार आहेत. त्यातील आठ पेट्या नेदरलॅंडमधील महाराष्ट्र मंडळाने प्रायोजित केल्या आहेत, तर चार पेट्यांची भेट नाशिकमधील उद्योजक श्रीरंग सारडा यांच्या देणगीतून दिल्या जाणार आहेत. उपक्रमाची मुहूर्तमेढ 2009 मध्ये 11 पेट्यांनी नाशिकमध्ये रोवली गेली. आतापर्यंत वाचन संस्कृतीची हीच चळवळ 521 पेट्यांपर्यंत पोचली असून ग्रंथसंपदा सव्वाकोटी रुपयांची झाली आहे. महाराष्ट्राबाहेर अनेक ठिकाणी विविध महाराष्ट्र मंडळे हा प्रकल्प राबवत आहेत. त्यात मात्र नेदरलॅंडमधील महाराष्ट्र मंडळाने वाचन संस्कृतीला बळकटी देणारा उपक्रम राबवण्याचे ठरवले, असे सांगून रानडे म्हणाले, की नेदरलॅंडमध्ये सुरू होणारी ही वाचन संस्कृतीची चळवळ युरोपभर विस्तारित होणार आहे.
सुवर्ण ग्रंथ पेटी’ सोहळा
'ग्रंथ तुमच्या दारी' योजनेचा उद्या कार्यक्रम
सध्याच्या तरुण पिढीत फेसबुकसारख्या सोशल नेटवर्किंग साइट्स, ईमेल, चॅटिंग तसेच टीव्ही, मोबाइल आदींचा अतिवापर होत आहे. त्यांच्यात वाचनाची आवड निर्माण व्हावी, वाचनसंस्कृतीचे पुनरुज्जीवन आणि संवर्धन व्हावे तसेच परस्परांत संवाद वाढावा या हेतूने सुरू केलेल्या ग्रंथ तुमच्या दारी या पुस्तक पेटी योजनेचा मुंबईतील सुवर्ण ग्रंथपेटी सोहळा उद्या, रविवार, ८ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे.
नाशिकचे कुसुमाग्रज प्रतिष्ठान यांची 'ग्रंथ तुमच्या दारी' ही पुस्तक पेटी वाचनालय योजना आहे. मुंबई पश्चिम विभागातर्फे, पश्चिम शहर आणि उपनगरात ही योजना राबविली जाते. त्यासाठी मुख्य व विभागीय समन्वयक असे स्वेच्छेने काम करणारे अनेक स्वयंसेवक लाभल्यामुळे पाच ग्रंथ पेट्यांनी गोरेगाव येथे सुरू झालेली ही योजना दोन वर्षांच्या अवधीत दहा पटींपेक्षा जास्त वाढून ५०वर पोहोचली आहे. शाळा, सोसायट्यांचे ऑफिस, डिस्पेन्सरी, मंदिर, घर आदी वाचकांच्या सोयीच्या ठिकाणी या पेट्या ठेवल्या आहेत.
या ५०व्या पेटीच्या निमित्ताने उद्या, रविवारी सायंकाळी पाच वाजता गोरेगाव पूर्व येथे प्रज्ञाप्रबोधिनी शाळेच्या पहिल्या मजल्यावरील सभागृहात 'सुवर्ण ग्रंथ पेटी' सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यास ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक, कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे विश्वस्त विनायक रानडे, कवी अशोक नायगांवकर, वामन हरी पेठे ज्वेलर्सचे विश्वनाथ पेठे उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्यास रसिकांनी आवर्जून उपस्थित रहावे, असे आवाहन Mahesh Abhyankar डॉ. महेश अभ्यंकर (९८२०४५०९८६) आणि अशोक काणे Ashok Kane(९८६९२४०५२६) यांनी केले आहे.
ग्रंथ निघाले …. सौदी अरेबियाला
खोबर दमान येथील प्रवीण मानकर यांच्या पुढाकाराने
तेथील महाराष्ट्र मंडळ हि योजना सुरु करत आहे .
दुबई येथून शुभारंभ झालेली ग्रंथ तुमच्या दारी योजना आखाती देशात विस्तारत आहे .
संपर्क -
प्रवीण मानकर
+९६६५०००२४३९८
mankarpv@gmail.com
दुबई , शारजा , ओमान , बहारीन , सौदी . . . . . .
अधिक माहिती साठी संपर्क
सौ स्वाती कडवे, +९७१ ५० २१५२७८२ दुबई
swati@kadwe.com
Swati Kadwe
Dr-Sandeep Kadwe
Director and Managing Consultant
MITCON International, Dubai
Mobile: (+971) 050 5876108
Web: www.mitcon.ae
Management | Investment | Technology | Consultancy
sandeep@kadwe.com
Vinayak Ranade
Mob - +91 99 22 22 5777
What'sup - + 91 9423972394
Email - vinran007@gmail.com
Skype - granth_vinayak
Face Book - http://www.facebook.com/vinran007
Blog - http://granthtumchyadari.blogspot.in/

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा