पोस्ट्स

korigad लेबलसह पोस्ट दाखवत आहे

कोरीगड किल्ला

पावसाला आता संपलाय आहे . पण त्याने केलेली जादू संपलेली नाही . पावसाळ्यानंतरचा काळ ट्रेक करण्यासाठी आदर्श काळ आहे आणि अशाच   मोसमात ट्रेकिंगला जाण्यासाठी सह्याद्रीतील पुष्कळ गडांचा पर्याय आपल्या समोर आहे .   असाच एक गड आज आपण पाहू फारसा कोणाला माहित नसलेला आणि त्यामुळे आपल्याला हवी ती शांतता मिळणारा . आपल्या देशामध्ये आणि इतर राज्यातही प्राचीन किल्ले , महाल , राजवाडे , मंदिर अस खूप काही बघण्यासारखे आहे . पण महाराष्ट्राचे खरे वैभव सह्याद्रीयाच्या कड्यांवर छाती पुढे काढून उभे राहिलेल्या   किल्ल्यामध्ये आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये . बऱ्याच   किल्ल्यावर आणि उंच डोंगरावर आपल्याला वेगवेगळी मंदिर आणि त्या - त्या किल्ल्याच्या नावाशी निगडीत देव किंवा देवी आढळतात . या किल्ल्यावरून देव - देवींना नाव पडले कि देव - देवींवरून किल्ल्याला नाव पडले हे सांगणे अवघडच . अशाच एका गडाला आपण भेट देत आहोत ....... कोरीगड किंवा कोराईगड नावाने ओळखला जाणारा एक शांत आणि मजबूत गड ....