Esahity pratishtan, ई साहित्य प्रतिष्ठान
ई साहित्य प्रतिष्ठान मनुष्य जन्म , आई-वडील, प्राणवायू आणि ईसाहित्य प्रतिष्ठानची ईपुस्तके फुकट मिळतात. पण म्हणून त्यांना कमी लेखाल तर ती मोठी चूक ठरेल. या वेबसाईटवर कुठेही बिनधास्त क्लिका . मोकळ्या मनाने फ़ेरफ़टका मारा. अगदी एखाद्या मंदिरात फ़िरता तसे. किंवा बागेत. सगळं फ़्री आणि ईझी. मराठी पुस्तकं वाचा. All Free Marathi books कुठेही पैशाची मागणी नाही. जाहिराती नाहीत. भलत्यासलत्या हायटेक लिंक्स नाहीत, व्हायरस नाही. इथे फ़िरा. बघा. बागडा. क्लिका. वाचा. डाऊनलोड करा. फ़्री मनाने, मनसोक्त. आत्मविश्वासाने. मराठी पुस्तक प्रेमिकांसाठी आहे हे. नियमित मराठी ई पुस्तके मिळवण्यासाठी ... आपला ई मेल पत्ता कळवा... esahity@gmail.com आनंद. फ़क्त घेऊ नका. द्या ! आपण डाऊनलोड केलेली मराठी ई पुस्तके वाटा. फ़्री. मेल , ब्ल्युटुथ, पेनड्राईव्ह. सीडी, कोणत्याही स्वरूपात भेट द्या. मस्त गिफ़्ट. मित्रमैत्रिणी, आई बाबा, मुलांना खुश करा. ई पुस्तके म्हणजे केसांत माळलेली फ़ुले. किंवा कानातला अत्तराचा फ़ाया. वजन ...