भूपतगड-प्राचीन पहारेकरी
भूपतगड-प्राचीन पहारेकरी -ओंकार ओक भूपतगड-प्राचीन पहारेकरी . . . . . ठाणे जिल्हा म्हणजे वैविध्यतेने समृद्ध अशा गडकोटांची खाणच !! केळवे-माहीमसारख्या निसर्गरम्य सागरी किल्ल्यांपासून ते अशेरी, कोहोज, तांदूळवाडीसारख्या बलदंड आणि राकट गिरीदुर्गापर्यंत अनेक सुंदर किल्ले ठाणे जिल्ह्याच्या नकाशावर आहेत. जव्हार हे ठाणे जिल्ह्यातल्या पालघर तालुक्यातील एक नितांत सुंदर ठिकाण !! खरं तर जव्हार हे पर्यटकांसीठीचं ""हिल स्टेशन'' असलं तरी इथल्या मुकणे राजवाड्यामुळे जव्हारला एक ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. याच जव्हारपासून फक्त 16 किलोमीटर्स वर एक अतिशय दूर्गम पण नितांतसुंदर असा गिरीदुर्ग वसला आहे... त्याचं नाव भूपतगड. जव्हारला भेट देणाऱ्या अनेकांना इतक्या जवळ एक किल्ला आहे याची कल्पनादेखील नसल्याने भूपतगड मात्र ट्रेकर्सच्या नकाशावरून काहीसा अदृश्यच झाला आहे. पण भूपतगडाचं स्थान पाहिल्यावर मात्र त्याचं भौगोलीक महत्त्व पटल्याशिवाय राहात नाही. भूपतगडाला भेट देण्यासाठी आपल्याला प्रथम जव्हार गाठावे लागते. जव्हारला जाण्यासाठी अनेक मार्ग असून त्यातील प्रचलित दोन मार्ग प्रसिद्ध आहे
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा